** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, November 1, 2020

आजअखेर 45 हजार 564 जणांना डिस्चार्ज

 


   कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 820 प्राप्त अहवालापैकी 775 निगेटिव्ह तर 40 अहवाल पॉझीटिव्ह आहेत (5 अहवाल नाकारण्यात आले). (ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 56 प्राप्त अहवालापैकी 54 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 2 आहेत(22 अहवाल निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआर पाठविण्यात आले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 50 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 46 तर 4 पॉझीटिव्ह  असे एकूण 46 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 48 हजार 189 पॉझीटिव्हपैकी 45 हजार 564 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 982 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 46 पॉझीटिव्ह अहवालापैकी चंदगड-3, गगनबावडा-1, हातकणंगले-5, करवीर-7, शाहूवाडी- 3, शिरोळ -5, नगरपरिषद क्षेत्र-12, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 10 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-845, भुदरगड- 1208, चंदगड- 1172, गडहिंग्लज- 1406, गगनबावडा- 142, हातकणंगले-5233, कागल-1638, करवीर-5547, पन्हाळा- 1837, राधानगरी-1213, शाहूवाडी-1323, शिरोळ- 2459, नगरपरिषद क्षेत्र-7343, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 604 असे एकूण 45 हजार 970 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 219 असे मिळून एकूण 48  हजार 189  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 48 हजार 189 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 45 हजार 564 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 643 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 982  इतकी आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.