कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती
कार्यालय): महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक
मतदारसंघाच्या द्ववार्षिक निवडणूक 2020 चा कार्यक्रम घोषित झाला आहे. या निवडणूकीचे
मतदान मंगळवार दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायकांळी 5 पर्यंत होणार असून
मतमोजणी गुरूवार दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे.
या
निवडणूकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा
हक्क बजाविता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्याचे मा.
मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून
निर्देश प्राप्त आहेत.
मतदानासाठी देण्यात आलेली रजा
ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.