कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती
कार्यालय) : पोस्ट मास्तर जनरल,
गोवा रिजन पणजी व्दारे दि. 30 मार्च रोजी सकाळी 11 वा. पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन पणजी
यांच्या कार्यालयामध्ये 47 वी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.
गोवा रिजनशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे
निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा
तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू/ मनीऑर्डर/ बचत
खाते/ प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा
उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार
पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इ.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निदेशक के. बालाराजू आणि सचिव,
डाक अदालत, पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन पणजी 403001 यांच्या नावे
दोन प्रतींसह दि. 30 मार्च पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रितीने पाठवावी.
त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.