** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, March 23, 2021

आजअखेर 49 हजार 101 जणांना डिस्चार्ज

 


  कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 908 प्राप्त अहवालापैकी 797 अहवाल निगेटिव्ह तर 32 अहवाल पॉझिटिव्ह (79 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 80 प्राप्त अहवालापैकी 71 अहवाल निगेटिव्ह तर 9 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 245 प्राप्त अहवालापैकी 221 निगेटिव्ह तर 24 अहवाल पॉझिटिव्ह असे एकूण 65 अहवाल पॉझीटिव्ह तर एकाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 51 हजार 403 पॉझीटिव्हपैकी 49 हजार 101 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 544 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

       आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 65 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-4, भुदरगड-1, चंदगड-1, गडहिंग्लज-1, हातकणंगले-4, करवीर-7, राधानगरी-2, शिरोळ-1, नगरपालिका क्षेत्र- 10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-27 व इतर जिल्हा व राज्यातील -7 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-906, भुदरगड- 1252, चंदगड- 1235, गडहिंग्लज- 1544, गगनबावडा- 155, हातकणंगले-5373, कागल-1695, करवीर-5823, पन्हाळा- 1887, राधानगरी-1267, शाहूवाडी-1367, शिरोळ- 2523, नगरपरिषद क्षेत्र-7642, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 16 हजार 157 असे एकूण 48 हजार 826 आणि इतर जिल्हा व राज्यातील -2 हजार 577 असे मिळून एकूण 51  हजार 403  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकुण 51 हजार 403 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 49 हजार 101 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 758 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 544 इतकी आहे.

0000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.