** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, March 22, 2021

जिजामाता/जिजाऊ अशी कोणतीही योजना महिला व बाल विकास विभागामार्फत राबविली जात नाही - एस. डी. शिंदे यांचे आवाहन

 


   कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : महिला व बाल विकास विभागाच्या जिजामाता/ जिजाऊ या योजनेंतर्गत प्रति लाभार्थी 50 हजार रुपये मिळतील अशा आशयाच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशी कोणतीही योजना महिला व बाल विकास विभागामार्फत राबविली जात नसून या मेसेजला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. डी. शिंदे यांनी केले आहे.

ज्या घरातील 21 ते 70 या वयोगटातील कर्त्या व्यक्तिचे निधन दिनांक 1 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत कोरोनामुळे झाले आहे, अशा विधवा झालेल्या महिलांना महिला व बाल विकास विभागाच्या जिजामाता/ जिजाऊ या योजनेंतर्गत 50 हजार रुपये प्रति लाभार्थी मिळतील अशी सोशल मिडीयाद्वारे व्हाट्स ॲपवर व्हायरल होत असलेली पोस्ट ही खोटी व बनावट असून अशा प्रकारची कोणतीही योजना महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित नाही.

0000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.