** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, March 18, 2021

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभा 8 एप्रिल रोजी

 

कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची उद्या शुक्रवार दि. 19 मार्च रोजी होणारी सभा अपरिहार्य कारणास्तव गुरूवार दि. 8 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभेचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांतर्गत आजअखेर झालेल्या उद्दिष्टपूर्तींचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक अध्यक्ष जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती तथा खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वा. छत्रपती महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.