** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, March 21, 2021

आजअखेर 49 हजार 17 जणांना डिस्चार्ज

 


          कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 944 प्राप्त अहवालापैकी 879 अहवाल निगेटिव्ह तर 29 अहवाल पॉझिटिव्ह (34 अहवाल नाकारण्यात आले व 2 पुन्हा नमुना अहवाल तपासणी). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 133 प्राप्त अहवालापैकी 122 अहवाल निगेटिव्ह तर 11 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 220 प्राप्त अहवालापैकी 180 निगेटिव्ह तर 40 अहवाल पॉझिटिव्ह असे एकुण 80 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 51 हजार 287 पॉझीटिव्हपैकी 49 हजार 17 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 514 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

       आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 80 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड- 2, चंदगड- 1, गडहिंग्लज-4,  हातकणंगले-4, करवीर-5, पन्हाळा- 1,  राधानगरी-2, शाहूवाडी-1, शिरोळ-1, नगरपालिका क्षेत्र-12, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-42 व इतर जिल्हा व राज्यातील -5 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-902, भुदरगड- 1251, चंदगड- 1234, गडहिंग्लज- 1543, गगनबावडा- 155, हातकणंगले-5364, कागल-1694, करवीर-5815, पन्हाळा- 1886, राधानगरी-1265, शाहूवाडी-1367, शिरोळ- 2518, नगरपरिषद क्षेत्र-7621, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 16 हजार 103 असे एकूण 48 हजार 718 आणि इतर जिल्हा व राज्यातील -2 हजार 569 असे मिळून एकूण 51  हजार 287  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकुण 51 हजार 287 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 49 हजार 17 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 756 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 514 इतकी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.