** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, March 16, 2021

आजअखेर 48 हजार 883 जणांना डिस्चार्ज

 


 

               कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 447 प्राप्त अहवालापैकी 429 अहवाल निगेटिव्ह तर 12 अहवाल पॉझिटिव्ह (6 अहवाल नाकारण्यात आले ). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 26 प्राप्त अहवालापैकी 26 अहवाल निगेटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 231 प्राप्त अहवालापैकी 200 निगेटिव्ह तर 31 अहवाल पॉझिटिव्ह असे एकुण 43 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 50 हजार 955 पॉझीटिव्हपैकी 48 हजार 883 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 321 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

       आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 43 पॉझीटिव्ह अहवालापैकी हातकणंगले-2, करवीर-5, पन्हाळा-1, राधानगरी-1, नगरपालिका क्षेत्र-3, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 25 व इतर जिल्हा व राज्यातील -6 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-897, भुदरगड- 1247, चंदगड- 1231, गडहिंग्लज- 1537, गगनबावडा- 154, हातकणंगले-5354, कागल-1692, करवीर-5779, पन्हाळा- 1880, राधानगरी-1259, शाहूवाडी-1365, शिरोळ- 2515, नगरपरिषद क्षेत्र-7573, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 943 असे एकूण 48 हजार 426 आणि इतर जिल्हा व राज्यातील -2 हजार 529 असे मिळून एकूण 50  हजार 955  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकुण 50 हजार 955 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 48 हजार 883 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकुण 1 हजार 751 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 321 इतकी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.