** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, March 16, 2021

शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज वर्ग करण्याचे समाज कल्याण अधिकाऱ्यांचे महाविद्यालयांना आवाहन

 


 कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 3 डिसेंबरपासून सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन हे अर्ज तात्काळ ऑनलाईन प्रणालीतून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

       सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील एकुण 41 हजार 370 विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर शिष्यवृत्ती अर्जासाठी नोंदणी केलेली होती. सन 2020-21 या आर्थिक वर्षात आजअखेर केवळ 33 हजार 606 मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले असून त्यापैकी 14 हजार 550 अर्ज संस्थास्तरावर प्रलंबित असल्याचे दिसून येते. सन 2020-21 या वर्षात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीमध्ये अर्ज भरण्याचे प्रमाण 80 टक्के आहे. सन 2020-21 हे आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने संबंधित महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणेबाबत तात्काळ कार्यवाही करावी.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.