** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, March 6, 2021

आजअखेर 48 हजार 516 जणांना डिस्चार्ज

 


 

 कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 419 प्राप्त अहवालापैकी 383 अहवाल निगेटिव्ह तर 13 अहवाल पॉझिटिव्ह (23 अहवाल नाकारण्यात आले आहेत). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 122 प्राप्त अहवालापैकी 121 अहवाल निगेटिव्ह तर 1 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 223 प्राप्त अहवालापैकी 203 निगेटिव्ह तर 20 अहवाल पॉझिटिव्ह असे एकुण 34 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 50 हजार 634 पॉझीटिव्हपैकी 48 हजार 516 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 372 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

       आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 34 पॉझीटिव्ह अहवालापैकी गडहिंग्लज-4, हातकणंगले-3, कागल-1, करवीर-3, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 20  व इतर जिल्हा व राज्यातील -3 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-895, भुदरगड- 1241, चंदगड- 1231, गडहिंग्लज- 1525, गगनबावडा- 154, हातकणंगले-5339, कागल-1687, करवीर-5754, पन्हाळा- 1876, राधानगरी-1255, शाहूवाडी-1364, शिरोळ- 2515, नगरपरिषद क्षेत्र-7537, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 771 असे एकूण 48 हजार 144 आणि इतर जिल्हा व राज्यातील -2 हजार 490 असे मिळून एकूण 50  हजार 634  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकुण 50 हजार 634 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 48 हजार 516 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 746 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 372 इतकी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.