कोल्हापूर,
दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : ख्रिश्चन बांधवांचा गुड फ्रायडे हा दिवस
दि. 2 एप्रिल रोजी तसेच ईस्टर सन्डे दि. 4 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे.
या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन केले जाते. कोविड-19 च्या वाढत्या
प्रादुर्भावाच्या पार्श्वमुमीवर सर्वधर्मीय सण साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत.
कोविड-19 चा प्रादुर्भाव अद्यापही असल्याने सर्वांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन
उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. दि. 28
मार्च ते 4 एप्रिल या 'होली वीक' दरम्यान येणारे "गुड फ्रायडे व ईस्टर
संडे" हे सण साधेपणाने साजरे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी
दिल्या आहेत.
1) दि. 28 मार्च ते 4 एप्रिल, 2021 या दरम्यान 'होली वीक' मध्ये प्रत्येक
प्रार्थना सभेच्या वेळी चर्च मधील जागेनुसार लोकांच्या उपस्थितीचे नियमन करावे.
मोठे चर्च असल्यास त्यामध्ये जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती व चर्चमधील जागा
कमी असल्यास तिथे 10 ते 25 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थनासभेचे आयोजन करावे.
जेणेकरुन चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी न होता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक
अंतर) राहील. आवश्यकतेनुसार 4 ते 5 खास प्रार्थना सभांचे (Multiple Masses) आयोजन
करावे.
2) ख्रिश्चन धर्मीय भावीक लोक हे प्रार्थना सभेच्या वेळी मास्क व सॅनिटायझरचा
वापर करतील याकडे
विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.
3) चर्चचे व्यवस्थापक यांनी प्रार्थना सभेच्या ऑनलाईन प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध
करुन देण्याची व्यवस्था करावी. तसेच या सणांसाठी दिले जाणारे संदेश व्हॉटसॲप,
फेसबुक, युटयूब यासारख्या सोशल मिडीया माध्यमांतून प्रसारीत करावे.
4)
चर्चच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी
अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे वा गर्दी करणे टाळावे.
5)
कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित
होईल अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच
मिरवणूका काढण्यात येऊ
नयेत.
6)
कोविड-19 च्या विषाणूंचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय
शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी
विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष
सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे
देखील अनुपालन करावे.
"गुड फ्रायडे आणि इस्टर
सन्डे" हे सण / उत्सव साजरा करतेवेळी नमुद सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आपल्या अधिनस्त
सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरुन सूचना देण्यात याव्यात. अशा सूचनाही जिल्हाधिकारी
श्री. देसाई यांनी दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.