कोल्हापूर, दि. 3 (जि.मा.का):- महाराष्ट्र
पोलीस आम्हाला तुमचा अभिमान वाटतो ll सलाम तुमच्या कर्तव्यास ll असे गौरवोदगार
काढत आज महाराष्ट्र राज्य वस्तु व सेवा कर विभागाच्या वतीने (जीएसटी)अहोरात्र सेवा
बजावत असलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना जेवणाचे पॅकेट्स आज देण्यात आले.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी जिल्हयात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात पोलीस
अधिकारी-कर्मचारी संचारबंदीची अंमलबजावणी करण्यसाठी पोलीसदल आहोरात्र जीवाची बाजी
लावून अहोरात्र सेवा बजावत आहेत. पोलीस दलाच्या या कार्याबद्दल राज्य वस्तु व सेवा
कर विभागाच्या वतीने पोलीस दलाचे कौतुक करुन महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमच्या
कामाचा अभिमान वाटतो ll सलाम तुमच्या कामास ॥ असा गौरव करुन वस्तु व सेवा कर विभाग,कोल्हापूर
यांच्या वतीने मा राज्यकर सहआयुक्त विकास मस्के, विकास डोके तसेच राज्यकर उपआयुक्त
वैशाली काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊन यशस्वी करण्याकरीता
कार्यरत असणाऱ्या पोलीसदलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात
आली. चपाती, भाजी, आमटी, भात असे जेवणाचे पॅकेट पोलीस निरिक्षक श्री. दुबल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी पोलीस
कॉन्स्टेबल श्री. सय्यद, धनंजय परब, शुभांगी जुगर आदिजण उपस्थित होते. या फुड
पॉकेट वाटप करण्याकरीता राज्यकर निरीक्षक सर्वश्री उदय माने, बजरंग मोरे तसेच
श्रीकांत भांडे, राजु अंबेकर, पोपट वाडेकर,
संदीप कुंभार यांचे सहकार्य लाभले.
000000


No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.