कोल्हापूर, दि. 31
(जिल्हा माहिती कार्यालय) : माझी वसुंधरा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी
करण्यासाठी वसुंधराच्या प्रती आपली जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांनी 1 ते 15
जानेवारी या कालावधीत हरितशपथ म्हणजेच (#Epledge) घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांनी केले आहे.
जिल्ह्यातील
सार्वजनिक मंडळे, हास्यकल्ब, तरुण मंडळे, शासकीय, राजकीय, सामाजिक तसेच निमशासकीय,
कार्यालये तसेच संस्थांमध्ये कार्यरत कर्मचारी, व्यक्ती यांनी माझी वसुंधरा
अभियानांतर्गत हरितशपथ घ्यावी. त्याची नोंद
www.majhivasundhara.in या
वेब पोर्टलवर करावी. राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती PDF स्वरुपात daokolhapur@gmail.com या ईमेल वर पाठवावी.
0
0 0 0 000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.