** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, December 9, 2020

निर्यातक्षम आंबा पिकांची मॅगोनेटव्‍दारे हॉर्टीनेट प्रणालीवर नोंदणी करण्‍याचे आवाहन

 


            कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय): सन 2020-21 वर्षामध्‍ये निर्यातक्षम आंबा पिकांची मॅगोनेटव्‍दारे हॉर्टीनेट प्रणालीवर नोंदणी करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 अशी आहे. निर्यातक्षम बागांची वेळेत नोंदणी करण्याकरिता मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून विहीत मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्‍या मॅगोनेट प्रणालीव्‍दारे  निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करीता मॅगोनेट ही ऑनलाईन प्रणाली दि. 1 डिसेंबर 2020 पासून कार्यान्वित करण्‍यात आलेली आहे. निर्यातक्षम बागांच्‍या नोंदणीकरिता अपेडाने फार्म रजिस्‍टेशन मोबाईल अॅप उपलब्‍ध केलेले आहे. हे अॅप डाऊनलोड करुन नोंदणी सुविधा करण्‍यात आलेल्‍या आहेत. तरी सर्व आंबा बागायतदारांनी 2020-21 नोंदणी करीता संबंधित कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, कृषि अधिकारी  व तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून त्‍वरीत अर्ज करावेत.

निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी 5 वर्षासाठी वैध असेल. त्‍यामुळे गतवर्षी नोंदणी केलेल्‍या आंबा बागांची नव्‍याने नोंदणी/नुतनीकरण करण्‍याची आवश्‍यकता नाही. तर नव्‍याने नोंदणी करण्यासाठी विहीत नमुन्‍यातील अर्ज, 7/12, 8अ, बागेचा नकाशा इ. कागदपत्रे  आवश्‍यक आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.