कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका (D.El.Ed.)
प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात
आल्या. अद्यापी शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीव्दारे
ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी दिली.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी
विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in
संकेत स्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश
नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
प्रवेशाची शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण (खुला संवर्ग 49.5
टक्के व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग 44.5 टक्के गुणांसह), प्रवेश अर्ज ऑनलाईन
भरण्याचा कालावधी दि. 22 ते 26 डिसेंबर, पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची
ऑनलाईन पडताळणी करणे व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करणे दि. 22 ते
27 डिसेंबर. प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाईन भरणे) खुला संवर्ग 200 रूपये. खुला संवर्ग
वगळून इतर संवर्ग 100 रूपये.
यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरून ॲप्रुव्ह करून घेतला आहे.
परंतु, प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण
किंवा दुरूस्तीमध्ये आहे तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेण्यास इच्छुक
असलेले असे सर्व उमेदवार अर्ज भरू शकतात. अर्ज ऑनलाईन ॲप्रुव्ह केल्याशिवाय
उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रकियेमध्ये विद्यार्थ्याने
स्वत:च्या लॉगीनमधून प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची
स्वत: निवड करून लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ई-मेल/ लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची
आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून
प्रवेश घ्यावयाचा आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही
परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.