** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, December 21, 2020

आजअखेर 47 हजार 614 जणांना डिस्चार्ज

 


         कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्ह्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1363 प्राप्त अहवालापैकी 1333 निगेटिव्ह पॉझीटिव्ह 5 (23 अहवाल नाकारण्यात तर 2 अहवाल पुन्हा तपासण्यात आले ). ॲन्टीजेन चाचणीचे 123 प्राप्त अहवालापैकी 123 निगेटिव्ह खासगी रुग्णालये/लॅबमध्ये 59 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 57 तर 2 पॉझीटिव्ह, असे एकूण 7 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 49 हजार 391 पॉझीटिव्हपैकी 47 हजार 614 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 7 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 7 पॉझीटिव्ह अहवालापैकी करवीर- 3 नगरपरिषद क्षेत्र- 2 व कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 2 असा समावेश आहे.

        आज अखेर  तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 873, भुदरगड- 1229, चंदगड- 1212, गडहिंग्लज- 1481, गगनबावडा- 148, हातकणंगले-5307, कागल-1664, करवीर- 5656, पन्हाळा- 1860, राधानगरी-1242, शाहूवाडी-1355, शिरोळ- 2508, नगरपरिषद क्षेत्र-7457, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 39 असे एकूण 47 हजार 614 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 360 असे मिळून एकूण 49 हजार 391 रुग्णांची आज अखेर जिल्ह्यात संख्या आहे.  

     जिल्ह्यातील 49 हजार 391 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 47 हजार 614 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 1 हजार 697 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात 80 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

0 0 0 0 0

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.