** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, December 13, 2020

आजअखेर 47 हजार 439 जणांना डिस्चार्ज

 

        कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्ह्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1385 प्राप्त अहवालापैकी 1363 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 5 आहेत. (17 नमुना अहवाल पुन्हा सादर). ॲन्टीजेन चाचणीचे 94 प्राप्त अहवालापैकी 90 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 4 आहेत. खासगी रुग्णालये/लॅबमध्ये 145 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 135 तर 10 पॉझीटिव्ह, असे एकूण 19 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 49 हजार 286 पॉझीटिव्हपैकी 47 हजार 439 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 155 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 19 पॉझीटिव्ह अहवालापैकी गडहिंग्लज- 3, करवीर–3, राधानगरी-1,नगरपरिषद क्षेत्र-1 व कोल्हापूर महापालिका क्षेत्र-8 व  इतर राज्य 3 असा समावेश आहे.

          आज अखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 869, भुदरगड- 1228, चंदगड- 1212, गडहिंग्लज- 1475, गगनबावडा- 148, हातकणंगले-5305, कागल-1664, करवीर- 5639, पन्हाळा- 1859, राधानगरी-1239, शाहूवाडी-1355, शिरोळ- 2505, नगरपरिषद क्षेत्र-7447, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 995 असे एकूण 46 हजार 940 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 346 असे मिळून एकूण 49 हजार 286 रुग्णांची आज अखेर जिल्ह्यात संख्या आहे.  

     जिल्ह्यातील 49 हजार 286 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 47 हजार 439  रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 1 हजार 692 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात 155 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

00000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.