कोल्हापूर,
दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय): दुधगंगा प्रकल्पातील निढोरी तसेच कूर शाखा कालवा
यावरील नियोजित आवर्तन पूर्ण करण्यासाठी डिसेंबरमध्ये शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या
उपसा यंत्रांवर उपसाबंदी करण्यात आली असल्याची माहिती पाटबंधारे विभाग (उत्तर)चे
उपकार्यकारी अभियंता यांनी दिली. तर पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या नळ पाणी
पुरवठा योजना उपसाबंदीमधून वगळण्यात येत आहेत.
दुधगंगा उजवा कालव्यावरील (मुख्य कालवा) कि.मी. 1 ते 24 पर्यंत
एैनी, आटेगांव, पंडेवाडी, सावर्डे-पाटणकर, कासारपुतळे, कासारवाडा, ढेंगेवाडी,
धामणवाडी, सरवडे इ. ता. राधानगरी व उंदरवाडी, बोरवडे ता. कागल या गावातील शेतीसाठी
वापरल्या जाणाऱ्या उपसायंत्रांवर दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते दि.
14 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत उपसाबंदी लागू करण्यात आली आहे.
वरील कालावधीमध्ये पिण्याच्या पाणी पुरवठा
व्यतिरिक्त इतर कारणासाठी (औद्योगिक व शेतीसाठी उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा
आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करून परवाना धारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या
कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार
नाही.)
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.