** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, December 26, 2020

आजअखेर 47 हजार 693 जणांना डिस्चार्ज

 


         कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्ह्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1038 प्राप्त अहवालापैकी 1005 निगेटिव्ह पॉझीटिव्ह 2 (31 अहवाल नाकारले ). ॲन्टीजेन चाचणीचे 90 प्राप्त अहवालापैकी 90 निगेटिव्ह, खासगी रुग्णालये/लॅबमध्ये 130 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 121 तर 9 पॉझीटिव्ह, असे एकूण 11 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 49 हजार 464 पॉझीटिव्हपैकी 47 हजार 693 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 71 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 11 पॉझीटिव्ह अहवालापैकी गडहिंग्लज-2, करवीर- 1,  नगरपरिषद क्षेत्र- 2 व कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 3, इतर जिल्हा व राज्यातील-3 असा समावेश आहे.

        आज अखेर  तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 873, भुदरगड- 1230, चंदगड- 1212, गडहिंग्लज- 1486, गगनबावडा- 148, हातकणंगले-5310, कागल-1664, करवीर- 5663, पन्हाळा- 1860, राधानगरी-1244, शाहूवाडी-1356, शिरोळ- 2509, नगरपरिषद क्षेत्र-7465, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 74  असे एकूण 47 हजार 94 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 370 असे मिळून एकूण 49 हजार 464 रुग्णांची आज अखेर जिल्ह्यात संख्या आहे.  

     जिल्ह्यातील 49 हजार 464 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 47 हजार 693 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 1 हजार 700 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात 71 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.