** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, December 15, 2020

आजअखेर 47 हजार 505 जणांना डिस्चार्ज

 


 

        कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्ह्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 203 प्राप्त अहवालापैकी 181 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 1 आहेत. (16 अहवाल नाकारण्यात तर  5 नमुना अहवाल पुन्हा सादर). ॲन्टीजेन चाचणीचे 70 प्राप्त अहवालापैकी 69 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 1 आहेत. खासगी रुग्णालये/लॅबमध्ये 140 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 130 तर 10 पॉझीटिव्ह, असे एकूण 12 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 49 हजार 310 पॉझीटिव्हपैकी 47 हजार 505 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 112 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 12 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड- 1, गडहिंग्लज-1, करवीर–1, नगरपरिषद क्षेत्र-1 व कोल्हापूर महापालिका क्षेत्र-4 व  इतर राज्य 4 असा समावेश आहे.

          आज अखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 869, भुदरगड- 1229, चंदगड- 1212, गडहिंग्लज- 1476, गगनबावडा- 148, हातकणंगले-5306, कागल-1664, करवीर- 5640, पन्हाळा- 1860, राधानगरी-1241, शाहूवाडी-1355, शिरोळ- 2505, नगरपरिषद क्षेत्र-7450, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 5 असे एकूण 46 हजार 960 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 350 असे मिळून एकूण 49 हजार 310 रुग्णांची आज अखेर जिल्ह्यात संख्या आहे.  

     जिल्ह्यातील 49 हजार 310 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 47 हजार 505  रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 1 हजार 693 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात 122 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.