** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, December 11, 2020

आजअखेर 47 हजार 372 जणांना डिस्चार्ज

 

        कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्ह्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1103 प्राप्त अहवालापैकी 1044 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 3 आहेत. (56 अहवाल नाकारण्यात आले). ॲन्टीजेन चाचणीचे 162 प्राप्त अहवालापैकी 162 निगेटिव्ह  आहेत. खासगी रुग्णालये/लॅबमध्ये 93 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 83 तर 10 पॉझीटिव्ह, असे एकूण 13 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 49 हजार 256 पॉझीटिव्हपैकी 47 हजार 372 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 193 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 13 पॉझीटिव्ह अहवालापैकी गडहिंग्लज- 1, करवीर–2, नगरपरिषद क्षेत्र-2 व कोल्हापूर महापालिका क्षेत्र-4 व  इतर राज्य 4 असा समावेश आहे.

          आज अखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 869, भुदरगड- 1228, चंदगड- 1212, गडहिंग्लज- 1472, गगनबावडा- 148, हातकणंगले-5304, कागल-1664, करवीर- 5636, पन्हाळा- 1859, राधानगरी-1238, शाहूवाडी-1355, शिरोळ- 2505, नगरपरिषद क्षेत्र-7444, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 982 असे एकूण 46 हजार 916 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 340 असे मिळून एकूण 49 हजार 256 रुग्णांची आज अखेर जिल्ह्यात संख्या आहे.  

     जिल्ह्यातील 49 हजार 256 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 47 हजार 372  रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 1 हजार 691 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात 193 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.