** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, December 7, 2020

दिवसभरात 35 रुग्ण कोरोनामुक्त; एकही मृत्यू नाही ; प्रशासनाचे यश

 


 

   कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्ह्यात आज दिवसभरात 35 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकही मृत्यूची नोंद नाही. जिल्ह्याच्या दृष्टीने ही समाधानाची बाब असून प्रशासनाचे हे यश आहे.

जिल्ह्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 717 प्राप्त अहवालापैकी 700 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 13 आहेत. (4 अहवाल नाकारण्यात आले). ॲन्टीजेन चाचणीचे 126 प्राप्त अहवालापैकी 126 निगेटिव्ह आहेत. खासगी रुग्णालये/लॅबमध्ये 89 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 76 तर 13 पॉझीटिव्ह, असे एकूण 26 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 49 हजार 186 पॉझीटिव्हपैकी 47 हजार 248 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 251 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 26 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-2, गडहिंग्लज-2, हातकणंगले-3, करवीर-1, शिरोळ-1, नगरपरिषद क्षेत्र-1 व कोल्हापूर महापालिका क्षेत्र-11 व  राज्य 5 असा समावेश आहे.

          आज अखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 865, भुदरगड- 1227, चंदगड- 1212, गडहिंग्लज- 1469, गगनबावडा- 147, हातकणंगले-5301, कागल-1664, करवीर-5630, पन्हाळा- 1857, राधानगरी-1238, शाहूवाडी-1353, शिरोळ- 2505, नगरपरिषद क्षेत्र-7436, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 958 असे एकूण 46 हजार 862 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 324 असे मिळून एकूण 49 हजार 186 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.  

     जिल्ह्यातील 49 हजार 186 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 47 हजार 248  रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 1 हजार 687 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात 251 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.