** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, December 18, 2020

आजअखेर 47 हजार 585 जणांना डिस्चार्ज

 


 

         कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्ह्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 191 प्राप्त अहवालापैकी 147 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 3 आहेत. (26 अहवाल नाकारण्यात तर पूर्वीचे 15 अहवाल पुन्हा तपाण्यात आले ). ॲन्टीजेन चाचणीचे 147 प्राप्त अहवालापैकी 144 निगेटिव्ह  तर 3 पॉझीटिव्ह आहेत. खासगी रुग्णालये/लॅबमध्ये 156 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 147 तर 9 पॉझीटिव्ह, असे एकूण 15 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 49 हजार 369 पॉझीटिव्हपैकी 47 हजार 585 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 88 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 15 पॉझीटिव्ह अहवालापैकी, गडहिंग्लज-2, करवीर- 4, नगरपरिषद क्षेत्र-1 व कोल्हापूर महापालिका क्षेत्र-4 व  इतर राज्य 4 असा समावेश आहे.

        आज अखेर  तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 873, भुदरगड- 1229, चंदगड- 1212, गडहिंग्लज- 1479, गगनबावडा- 148, हातकणंगले-5307, कागल-1664, करवीर- 5651, पन्हाळा- 1860, राधानगरी-1242, शाहूवाडी-1355, शिरोळ- 2507, नगरपरिषद क्षेत्र-7454, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 30 असे एकूण 47 हजार 11 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 358 असे मिळून एकूण 49 हजार 369 रुग्णांची आज अखेर जिल्ह्यात संख्या आहे.  

     जिल्ह्यातील 49 हजार 369 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 47 हजार 585  रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 1 हजार 696 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात 88 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

0 0 0 0 0

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.