** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, December 15, 2020

क्रीडा विभागामार्फत मानक कार्यप्रणाली https://sports.maharashtra.gov.in वर -डॉ. चंद्रशेखर साखरे

 


    कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): कोविड -19  प्रादुर्भावाच्या परिस्थितीमध्ये क्रीडा विभागामार्फत मानक कार्यप्रणाली (SOP) प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये खेळाची वैयक्तीक खेळ प्रकार, सांघिक खेळ प्रकार, प्रशिक्षण केंद्र, स्पोर्ट क्लब्स, सराव केंद्रे, खेळाडू, मार्गदर्शक, क्रीडा संकुले यांनी पाळावयाची खबरदारी याची माहिती  https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी दिली.

जिल्ह्यातील खेळाडूंनी, क्रीडा संघटनांनी, शाळा, महाविद्यालये, खासगी क्रीडा संकुले, स्पोर्ट्स क्लब्स, शासकीय, निमशासकीय विभागांनी  https://sports.maharashtra.gov.in/nfsshare/sports_ma/circulars/1602845494_sop_covid_19.pdf  या लिंकला भेट देवून माहिती मिळवावी व त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे अवाहनही श्री. साखरे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.