कोल्हापूर, दि.
14 (जिल्हा माहिती कार्यालय): प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर यांच्यामार्फत
मंगळवार दि. 22 डिसेंबर रोजी दुपारी 3 वा. प्रवर अधीक्षक कार्यालयात डाक अदालतीचे
आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.
डाकघर
विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी
किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल
व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल.
विशेषत: टपाल वस्तू/ मनीऑर्डर/ बचत खाते/ प्रमाणपत्र इ. बाबतच्या तक्रारी विचारात
घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या
अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इ. संबंधितांनी डाक
सेवेबाबतची आपली तक्रार आय.डी. पाटील, प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर-
416003 यांच्या नावे दोन प्रतींसह दि. 18 डिसेंबर पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल
अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक आदलतीमध्ये दखल घेतली
जाणार नाही.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.