** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, May 13, 2021

60 वर्षापुढील ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी वेगळी रांग पालकमंत्री सतेज पाटील यांची सूचना

 


 

कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) : लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी होत असून यामध्ये 60 वर्षापुढील ज्येष्ठांची सोय व्हावी, त्यांना दिवसभर रांगेत थांबायला लागू नये, यासाठी त्यांची स्वतंत्र वेगळी रांग करावी, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

       जिल्ह्यातील केंद्रांवर सर्वच ठिकाणी 45 ते 60 वयोगटातील लसीकरणासाठी गर्दी होत आहे. यामध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठांना थांबावे लागते. यात अनेकजण इतर आजाराने ग्रस्त असतात. अशा ज्येष्ठांची सोय व्हावी. त्यांना त्रास होऊ नये. त्यांचे लसीकरण सहजरित्या व्हावे, त्यासाठी त्यांची वेगळी स्वतंत्र रांग करावी अशी सूचना पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.