** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, May 10, 2021

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थींना धान्य वाटप

 


 

   कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थीना विहीत वेळेत व पुरेसे अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रीय अन्न  सुरक्षा योजनेतील नियमित अंत्योदय योजनेतील लाभार्थींना प्रति शिधापत्रिका 10 किलो तांदूळ व 25 किलो गहू व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीना प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ व 3 किलो गहू मोफत वाटप करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.

माहे मे 2021 करिता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अतिरिक्त अन्नधान्य अंत्योदय योजनेतील लाभार्थीना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीना प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ व 3 किलो गहू मोफत वाटप करण्यात येत असल्याचेही श्री. कवितके यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.  

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.