** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, May 25, 2021

बचत गटांना मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


   कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा लाभ घेण्यासाठी विभागाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले.

 अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करावयाची आहेत.

1) अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गट हा पुरूष किंवा महिलांचा असावा.

2) बचत गटांची नोंदणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती व कृषी विभाग यांच्याकडे नोंदणी झाल्याबाबतचे बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र असावे. स्वयंसहाय्यता बचत गटातील 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत व ते महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.

3) बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातीलच असावेत.

4) मिनी ट्रक्टर व त्याची उपसाधने यांची कमाल किंमत रूपये 3.50 लाख राहील. त्यामध्ये 90 टक्के म्हणजेच रूपये 3.15 लाख शासकीय अनुदान व स्वयंसहाय्यता बचत गटाचा हिस्सा 10 टक्के म्हणजेच रूपये 35 हजार इतका असेल.

6) स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न करावे.

7) उपलब्ध तरतुदीच्या अनुषंगाने अर्जदारांची संख्या जास्त असल्यास लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.

इच्छुक स्वयंसहाय्यता बचत गटांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या नावे अर्ज सादर करावेत. तसेच अधिक माहिती  करिता कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. लोंढे यांनी केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.