कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने
लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात
आतापर्यंत एकूण 8 लाख 87 हजार 980 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
यामध्ये एकूण 41 हजार 187 हेल्थ वर्करनी पहिला
डोस तर 21 हजार 596 जणांनी दुसरा डोस घेतला. 57 हजार 998 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 23 हजार 627 जणांनी दुसरा
डोस घेतला आहे. 18 ते 45 वर्षे वयोगटातील 15 हजार 121 जणांनी पहिला डोस तर 348
जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त
व्यक्ती यामध्ये इतर व्याधी असलेल्या 3 लाख 80 हजार 437 नागरिकांनी पहिला डोस तर 60
हजार 018 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर 60 वर्षावरील एकूण 3 लाख 93 हजार 237
नागरिकांनी पहिला डोस तर 1 लाख 14 हजार 249
जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 8 लाख 87 हजार 980 जणांनी पहिला डोस तर 2
लाख 19 हजार 838 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.