** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, May 12, 2021

जिल्ह्यात 8 लाख 81 हजार जणांनी घेतला पहिला डोस

 


 

कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) :  वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 8 लाख 81 हजार 426 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

 यामध्ये एकूण 40 हजार 917 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 21 हजार 321 जणांनी दुसरा डोस घेतला.  56 हजार 210 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 22 हजार 589 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 45 वर्षे वयोगटातील 15 हजार 082 जणांनी पहिला डोस तर 134 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्ती यामध्ये इतर व्याधी असलेल्या 3 लाख 77 हजार 442 नागरिकांनी पहिला डोस तर 51 हजार 193 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर 60 वर्षावरील एकूण 3 लाख 91 हजार 775 नागरिकांनी पहिला डोस तर 98 हजार 470 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 8 लाख 81 हजार 426 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 93 हजार 707 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

00000

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.