** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, May 30, 2021

आजअखेर 92 हजार 245 जणांना डिस्चार्ज

 


 

   कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2562 प्राप्त अहवालापैकी 2149 अहवाल निगेटिव्ह तर 331 अहवाल पॉझिटिव्ह (82 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 4445 प्राप्त अहवालापैकी 3873 अहवाल निगेटिव्ह तर 572 अहवाल पॉझिटिव्ह (463 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 3049 प्राप्त अहवालापैकी 2193  निगेटिव्ह तर 856 पॉझीटिव्ह  असे एकूण 1759 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर  एकुण 37 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 11 हजार 350 पॉझीटिव्हपैकी 92 हजार 245 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 15 हजार 433 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1759 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-36, भुदरगड-55, चंदगड-37, गडहिंग्लज-56, गगनबावडा-5, हातकणंगले-203, कागल-62,  करवीर-336, पन्हाळा-147, राधानगरी-20, शाहूवाडी-22, शिरोळ-56, नगरपरिषद क्षेत्र-136, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 477, इतर जिल्हा व राज्यातील-111 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-2441, भुदरगड- 3084, चंदगड- 2580, गडहिंग्लज- 4169, गगनबावडा- 484, हातकणंगले-11644, कागल-3618, करवीर-13661, पन्हाळा- 4859, राधानगरी-2262, शाहूवाडी-2789, शिरोळ- 6943, नगरपरिषद क्षेत्र-13710, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 32 हजार 229 असे एकूण  1 लाख 4 हजार 461 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 6 हजार 889 असे मिळून एकूण 1 लाख 11  हजार 350 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 1 लाख 11 हजार 350 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 92 हजार 245 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 3 हजार 672 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 15 हजार 433 इतकी आहे.

0000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.