** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, May 6, 2021

जिल्ह्यात 8 लाख 59 हजार 330 जणांनी घेतला पहिला डोस

 


 

कोल्हापूर, दि. 6 :  वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 8 लाख 59 हजार 330 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

 यामध्ये एकूण 40 हजार 420 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 20 हजार 702 जणांनी दुसरा डोस घेतला.  52 हजार 581 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 19 हजार 604 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्ती यामध्ये इतर व्याधी असलेल्या 3 लाख 71 हजार 886 नागरिकांनी पहिला डोस तर 34 हजार 748 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर 60 वर्षावरील एकूण 3 लाख 88 हजार 837 नागरिकांनी पहिला डोस तर 71 हजार 554 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 8 लाख 59 हजार 330 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 46 हजार 608 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.