** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, May 29, 2021

पालकमंत्री आज ऑनलाईन संवाद साधणार

 


       कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने लहान मुलांना होणाऱ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  0 ते 18 वर्षे वयोगटातील  बालकांच्या/विद्यार्थ्यांच्या  शिक्षकांचे व  पालकांचे   https://youtu.be/BY20UBRIHPY  या युट्यूब लिंकद्वारे जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील हे आमदार जयंत आसगांवकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई व सी.पी.आर. रुग्णालयातील बालरोग विभाग प्रमुख आदी मान्यवर रविवार दि. ३० मे रोजी सकाळी १० वा. संवाद साधणार आहेत . या मार्गदर्शन सत्रासाठी कोल्हापुर जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शासकीय व खासगी  शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, बालवाडी शिक्षिका व बालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी वर नमुद केलेल्या लिंकद्वारे online उपस्थित राहावे असे. आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.