** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, May 16, 2021

आजअखेर 71 हजार 973 जणांना डिस्चार्ज

 


 

            कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2868 प्राप्त अहवालापैकी 2401 अहवाल निगेटिव्ह तर 343 अहवाल पॉझिटिव्ह (104 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 1591 प्राप्त अहवालापैकी 1227 अहवाल निगेटिव्ह तर 319 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 1211 प्राप्त अहवालापैकी 706 निगेटिव्ह तर 505 पॉझीटिव्ह  असे एकूण 1167 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण 52 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 88 हजार 54 पॉझीटिव्हपैकी 71 हजार 973 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 13027 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1167 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-30, भुदरगड-8,चंदगड-23, गडहिंग्लज-93, हातकणंगले-120, कागल-45,  करवीर-140, पन्हाळा-45, राधानगरी-14, शाहूवाडी-35, शिरोळ-131, नगरपरिषद क्षेत्र-126, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-295, इतर जिल्हा व राज्यातील-62असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-2000, भुदरगड- 2417, चंदगड- 2096, गडहिंग्लज- 3168, गगनबावडा- 337, हातकणंगले-8752, कागल-3012, करवीर-10 हजार 151, पन्हाळा- 3512, राधानगरी-1814, शाहूवाडी-2436, शिरोळ- 5260, नगरपरिषद क्षेत्र-11 हजार 111, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 26 हजार 454 असे एकूण  82 हजार 520 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 5 हजार 534 असे मिळून एकूण 88  हजार 54 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 88 हजार 54 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 71 हजार 973 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 3 हजार 54 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 13027 इतकी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.