** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, May 31, 2021

आजअखेर 93 हजार 542 जणांना डिस्चार्ज


 

   कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 3295 प्राप्त अहवालापैकी 2488 अहवाल निगेटिव्ह तर 688 अहवाल पॉझिटिव्ह (119 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 3229 प्राप्त अहवालापैकी 2794 अहवाल निगेटिव्ह तर 435 अहवाल पॉझिटिव्ह (241 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 3054 प्राप्त अहवालापैकी 2258  निगेटिव्ह तर 796 पॉझीटिव्ह  असे एकूण 1919 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर  एकुण 40 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 13 हजार 269 पॉझीटिव्हपैकी 93 हजार 542 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 16 हजार 015 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1919 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-36, भुदरगड-68, चंदगड-63, गडहिंग्लज-86, गगनबावडा-13, हातकणंगले-189, कागल-53,  करवीर-303, पन्हाळा-146, राधानगरी-26, शाहूवाडी-29, शिरोळ-180, नगरपरिषद क्षेत्र-220, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 433, इतर जिल्हा व राज्यातील-74 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-2477, भुदरगड- 3152, चंदगड- 2643, गडहिंग्लज- 4255, गगनबावडा- 497, हातकणंगले-11833, कागल-3671, करवीर-13964, पन्हाळा- 5005, राधानगरी-2288, शाहूवाडी-2808, शिरोळ- 7123, नगरपरिषद क्षेत्र-13930, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 32 हजार 662 असे एकूण  1 लाख 6 हजार 308 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 6 हजार 961 असे मिळून एकूण 1 लाख 13  हजार 269 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 1 लाख 13 हजार 269 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 93 हजार 542 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 3 हजार 712 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 16 हजार 015 इतकी आहे.

0000000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.