कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने
लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात
आतापर्यंत एकूण 8 लाख 93 हजार 480 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
यामध्ये एकूण 41 हजार 340 हेल्थ वर्करनी पहिला
डोस तर 21 हजार 743 जणांनी दुसरा डोस घेतला. 59 हजार 216 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 23 हजार 976 जणांनी दुसरा
डोस घेतला आहे. 18 ते 45 वर्षे वयोगटातील 15 हजार 555 जणांनी पहिला डोस तर 478
जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त
व्यक्ती यामध्ये इतर व्याधी असलेल्या 3 लाख 83 हजार 50 नागरिकांनी पहिला डोस तर 61
हजार 609 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर 60 वर्षावरील एकूण 3 लाख 94 हजार 319
नागरिकांनी पहिला डोस तर 1 लाख 16 हजार 797
जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 8 लाख 93 हजार 480 जणांनी पहिला डोस तर 2
लाख 24 हजार 603 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.