कोल्हापूर,
दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर
दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 8 लाख 75 हजार 563
नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
यामध्ये एकूण 40 हजार 818
हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 21 हजार 222 जणांनी दुसरा डोस घेतला. 55 हजार
293 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 22 हजार 042 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच
60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्ती यामध्ये इतर व्याधी असलेल्या 3 लाख
76 हजार 445 नागरिकांनी पहिला डोस तर 49 हजार 003 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
18
ते 45 वर्षे वयोगटातील 11 हजार 852 जणांनी पहिला डोस तर 84 जणांनी दुसरा
डोस घेतला आहे. तर 60 वर्षावरील एकूण 3 लाख 91 हजार 155 नागरिकांनी पहिला डोस तर 94
हजार 332 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 8 लाख 75 हजार 563 जणांनी पहिला
डोस तर 1 लाख 86 हजार 683 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.