** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, May 12, 2021

आजअखेर 67 हजार 107 जणांना डिस्चार्ज

 


 

   कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 4593 प्राप्त अहवालापैकी 3253 अहवाल निगेटिव्ह तर 1196 अहवाल पॉझिटिव्ह (115 अहवाल नाकारण्यात आले तर 29 अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 2000 प्राप्त अहवालापैकी 1469 अहवाल निगेटिव्ह तर 531 अहवाल पॉझिटिव्ह (71 अहवाल आरटीपीसीआरला पाठविले). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 1149 प्राप्त अहवालापैकी 602 निगेटिव्ह तर 547 पॉझीटिव्ह  असे एकूण 2274 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण 58 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 82 हजार 763 पॉझीटिव्हपैकी 67 हजार 107 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 12816 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 2274 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-51, भुदरगड-41, चंदगड-120, गडहिंग्लज-128, गगनबावडा-8, हातकणंगले-213, कागल-161,  करवीर-252, पन्हाळा-129, राधानगरी-28, शाहूवाडी-98, शिरोळ-200, नगरपरिषद क्षेत्र-181 कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 428, इतर जिल्हा व राज्यातील-206 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-1850, भुदरगड- 2254, चंदगड- 2039, गडहिंग्लज- 2851, गगनबावडा- 329, हातकणंगले-8245, कागल-2729, करवीर-9474, पन्हाळा- 3318, राधानगरी-1715, शाहूवाडी-2350, शिरोळ- 4815, नगरपरिषद क्षेत्र-10606, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 25 हजार 091 असे एकूण  77 हजार 666 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 5 हजार 097 असे मिळून एकूण 82  हजार 763 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 82 हजार 763 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 67 हजार 107 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 2 हजार 840 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 12816 इतकी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.