** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, May 15, 2021

आजअखेर 70 हजार 412 जणांना डिस्चार्ज

 

 

   कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 4475 प्राप्त अहवालापैकी 3411 अहवाल निगेटिव्ह तर 879 अहवाल पॉझिटिव्ह (170 अहवाल नाकारण्यात आले तर 8 अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 2024 प्राप्त अहवालापैकी 1688 अहवाल निगेटिव्ह तर 336 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 1313 प्राप्त अहवालापैकी 767 निगेटिव्ह तर 546 पॉझीटिव्ह  असे एकूण 1761 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण 62 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 86 हजार 887 पॉझीटिव्हपैकी 70 हजार 412 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 13473 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1761 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-69, भुदरगड-144,चंदगड-18, गडहिंग्लज-155, गगनबावडा-4, हातकणंगले-139, कागल-94,  करवीर-178, पन्हाळा-69, राधानगरी-50, शाहूवाडी-33, शिरोळ-151, नगरपरिषद क्षेत्र-183, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 375, इतर जिल्हा व राज्यातील-99 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-1970, भुदरगड- 2409, चंदगड- 2073, गडहिंग्लज- 3075, गगनबावडा- 337, हातकणंगले-8632, कागल-2967, करवीर-10 हजार 011, पन्हाळा- 3467, राधानगरी-1800, शाहूवाडी-2401, शिरोळ- 5129, नगरपरिषद क्षेत्र-10 हजार 985, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 26 हजार 159 असे एकूण  81 हजार 415 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 5 हजार 472 असे मिळून एकूण 86  हजार 887 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 86 हजार 887 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 70 हजार 412 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 3 हजार 002 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 13473 इतकी आहे.

0000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.