** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, May 23, 2021

किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी येथील गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 


 

कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हयामध्ये कोव्हीड-19 (दुसरी लाट) संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्याअनुषंगाने शासनाकडून प्राप्त निर्देशासअनुसरून कोल्हापूर जिल्हयात दिनांक 23/05/2021 रोजीचे रात्रौ 12.00 वा ते. दिनांक 01/06/2021 रोजी सकाळी 7.00 वा. पर्यंत काही अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध घातलेबाबतचे आदेश परित केलेला आहे.

किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी आणि सर्व खाद्य दुकाने, कृषी विषयक सेवा हया सकाळी 7.00 वा ते सकाळी 11.00 वा या कालावधी मध्ये सुरू राहणार आहेत. सदर दुकाने एकत्रित असलेल्या ठिकाणी किंवा भाजीमंडईमध्ये सदर कालावधीमध्ये मोठया प्रमाणात गर्दी होऊन अशा ठिकाणी कोव्हीड-19 संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असलेचे दैंनदिन अहवालावरून दिसून येत आहे.

त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी, जास्त दुकाने एकत्रित असलेल्या ठिकाणी तसेच भाजीमंडई, फळविक्रेते असलेल्या ठिकाणी खालीलप्रमाणे आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.

1.         भाजी / फळ विक्रेत्यांसाठी विकेंद्रीत पध्दतीने व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून काही ठराविक ठिकाणी गर्दी होणार नाही.

2.         अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने, भाजीमंडई, फळविक्रेते इत्यादी ठिकाणी 'मास्क नाही - प्रवेश नाही' 'सामाजिक अंतर नसेल तर वितरणही नाही ' या आदेशाचे काटेकोरपणे पालन विक्रेते व ग्राहक यांचेकडे होत आहे अगर कसे? याबाबतची तपासणी करणेकामी विशेष पथके नेमावीत. 

3.         विक्रेते व ग्राहकांकडून योग्य सामाजिक अंतर राखले जात आहे, मास्कचा वापर केला जात आहे याविषयी खात्री करणे व सदरचे उल्लंघन होत असल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. विक्रेत्याकडून यांचे वारंवार उल्लघन होत असल्यास सदर दुकाने कडक निर्बध जोपर्यत लागू आहेत, तोपर्यत बंद करणेत यावीत.

4.        अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने एकत्रित असलेल्या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिक एकत्र येत आहेत अशा ठिकाणाबाबत आपल्या स्तरावरून योग्य ती अनुषांगीक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच सदर दुकाने चालू राहणेच्या वेळा व दिवस निश्चित करून द्याव्यात.

5.         कायमस्वरूपी त्या ठिकाणी नसलेल्या वरील सेवाबाबत खुल्या सार्वजनिक जागा शोधून त्या ठिकाणी त्यांना सेवा देणेबाबत जागा नेमून देणेत याव्यात.

6.         भाजीमंडई, फळविक्रेते यांचेदेखील खुल्या सार्वजनकि जागा शोधून विकेंद्रीत ठिकाणी दोन विक्रेत्यामध्ये जास्तीत जास्त सामाजिक अंतर ठेवून सेवा देणेकामी जागा नेमून देणेत याव्यात. व अशा जागा सर्व विक्रेते व नागरिकांच्या निर्दशनास आणून द्याव्यात.

सदर विक्रेते कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी, रत्याच्या बाजूला विक्रीस बसणार नाहीत याची कटाक्षाने अंमलबजावणी करणेत यावी.

7.        अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने (मेडकील दुकाने वगळून) उपरोक्त नमूद कालावधीमध्येच सुरू राहतील याची दैंनदिन तपासणी करून खात्री करणे.

8.         अत्यावयश्यक सेवाची ठिकाणे ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोव्हीड -19 चा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत होणार नाहीत, याबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणेत याव्यात.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.