** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, May 17, 2021

लसीकरणासाठी दिव्यांग व्यक्तिंना प्रथम प्राधान्य

 

कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार कोव्हिड 19 लसीकरण केंद्रावर दिव्यांग व्यक्तिंच्या लसीकरणासाठी नियोजन करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.

यासाठी दिव्यांग व्यक्तिंची स्वतंत्र रांग करून त्यांना प्राधान्याने लस उपलब्ध करून द्यावी. लसीकरण सत्राच्या ठिकाणी व्हील चेअर उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी होणारा खर्च रूग्ण कल्याण समिती अथवा इतर निधीतून करण्यात यावा. ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती व दिव्यांग व्यक्ती यांचेसोबत एक मदतनीस लसीकरणाच्या सत्राच्या ठिकाणी उपस्थित. कोणतीही दिव्यांग व्यक्ती लसीपासून वंचित राहणार नाही याबाबत ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य कर्मचारी यांचेकडून खात्री करून घ्यावी, असेही श्री. घाटे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.