** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, August 3, 2019

श्रावण षष्ठी यात्रा कालावधीत वाहतूक नियमन आदेश जारी



                                                                                                                            
                कोल्हापूर, दि. 3 (जि.मा.का.) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे दि. 5 ते 6 ऑगस्ट  या कालावधीत जोतिबा देवाची श्रावण षष्ठी  यात्रा होत आहे.  यात्रा कालावधीत जोतिबा डोंगरावर येणाऱ्या मोटार वाहनांची संख्या तसेच पार्किंग जागेची उपलब्धता आणि भौगोलिक परिस्थिती या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिनांक 5 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 6 ऑगस्ट  रोजी रात्री 11 वाजेपर्यंत  वाहतूक नियमन आदेश जारी केला आहे.
            जोतिबा यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतुकीची  परिस्थिती विचारात घेऊन दानेवाडी फाटा ते दानेवाडी क्रॉसिंग ते जुने अंब्याचे झाड ते जोतिबा प्रवासी टोल नाका ते पी.डब्ल्यू.डी. रेस्ट हाऊस वाडीरत्नागिरी ते यमाई मंदिर कॉर्नर ते गिरोली घाट या दरम्यानच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस थांबणेस व पार्कींग करण्यास मनाई करण्यात येत आहे.
          या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो कायदेशीर कारवाईस पात्र राहिल.
000000
           

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.