** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 22, 2019

आजअखेर 29 कोटी 76 लाख 80 हजार रुपये सानुग्रह वाटप जिल्ह्यात 602.71 मे.टन मोफत गहू आणि तांदूळ वितरीत -जिल्हाधिकारी दौलत देसाई




        कोल्हापूर, दि. 22 (जि.मा.का.) : ग्रामीण भागातील 47 हजार 694 आणि शहरी भागातील 11 हजार 842 कुटुंबांना रोख 5 हजार रुपये प्रमाणे आज अखेर 29 कोटी 76 लाख 80 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. पूरबाधित गावांतील 60 हजार 271 कुटुंबांना प्रत्येकी 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ याप्रमाणे 602.71 मे.टन मोफत गहू आणि तांदूळ वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
            सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आलेली तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे - करवीर ग्रामीण 8 हजार 420 शहरी  2 हजार 569 कुटुंब 5 कोटी 49 लाख 45 हजार, कागल ग्रामीण 1 हजार 776 कुटुंब शहरी भागात 61 कुटुंब 91 लाख 85 हजार, पन्हाळा ग्रामीण  875 कुटुंब 43 लाख 75 हजार, शाहुवाडी ग्रामीण 401 शहरी 61 कुटुंब 23 लाख 10 हजार, हातकणंगले ग्रामीण  8 हजार 221 शहरी  3 हजार 131 कुटुंब 5 कोटी 67 लाख 60 हजार, शिरोळ ग्रामीण  25 हजार 855  शहरी  5 हजार 844 कुटुंब  15 कोटी 84 लाख 95 हजार, राधानगरी ग्रामीण 747 कुटुंब 37 लाख 35 हजार, भुदरगड ग्रामीण 147 कुटुंब 7 लाख 35 हजार, गगनबावडा ग्रामीण 101 कुटुंब संख्या 5 लाख 5 हजार  व धनादेशाव्दारे 83 कुटुंबाना 4 लाख 15 हजार, गडहिंग्लज ग्रामीण 917 शहरी  168 कुटुंब 54 लाख 25 हजार, आजरा ग्रामीण  38 व शहरातील 8 कुटुंब 2 लाख 30 हजार व धनादेशाव्दारे ग्रामीण 38 व शहरातील 8 कुटुंबाना 2 लाख 70 हजार आणि चंदगड ग्रामीण 196 कुटुंबाना  9 लाख 80 हजार असे एकूण 29 कोटी 76 लाख 80 हजार अनुदानाचे वाटप करण्यात आले.
0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.