** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 16, 2019

56 हजार 394 पूरग्रस्तांची संक्रमण शिबिरात सोय -जिल्हाधिकारी दौलत देसाई



कोल्हापूर दि.16 (जिमाका)  :- पूरग्रस्तांसाठी जिल्हयात 181 संक्रमण शिबिर सुरु करून त्यामध्ये 56 हजार 394 लोकांची सोय करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हयातील 181 संक्रमण शिबिरातील 56 हजार 394 लोकांची तालुकानिहाय माहिती अशी- शिरोळ तालुक्यातील 102 संक्रमण शिबिरामध्ये 33 हजार 681 लोकांची सोय करण्यात आली आहे. करवीर ग्रामीणमध्ये 5 संक्रमण शिबिरामध्ये 211 लोकांची सोय करण्यात आली आहे. कोल्हापूर शहर विभागात 12 संक्रमण शिबिरामध्ये 726  लोकांची सोय करण्यात आली आहे. हातकणंगले तालुक्यातील 14 संक्रमण शिबिरामध्ये 4 हजार 201 लोकांची सोय करण्यात आली आहे. इचलकरंजी शहरामध्ये 48 संक्रमण शिबिरामध्ये 17 हजार 575 लोकांची सोय करण्यात आली आहे. संक्रमण शिबिरातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबरोबरच पाणी, आरोग्य अशा पायाभूत सुविधा उपलब्ध  करुन देण्यास  प्रशासनाने प्राधान्य दिले असल्याचेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.