कोल्हापूर,
दि. 22 (जि.मा.का.) : राधानगरी विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग
करण्यात येत आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे
समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज दिली.
पंचगंगा नदीची
राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी
7 वाजता 13.10 फूट असून, एकूण 1 बंधारा पाण्याखाली आहे. राधानगरी धरणात आज
अखेर 7.90 टीएमसी पाणीसाठा आहे. तुळशी मोठा प्रकल्प, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा
कोदे लघुप्रकल्प, पाटगाव, कासारी व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले
आहेत.
पंचगंगा
नदीवरील- इचलकरंजी असा 1 बंधारा
पाण्याखाली आहे. नजिकच्या अलमट्टी धरणात 121.26
टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 100.50 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे
पाणीसाठा आहे. तुळशी 3.47 टीएमसी, वारणा
32.46 टीएमसी, दूधगंगा 24.44 टीएमसी, कासारी 2.77 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी
2.54 टीएमसी, पाटगाव 3.68 टीएमसी, चिकोत्रा 1.51, चित्री 1.87 टीएमसी, जंगमहट्टी
1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
बंधाऱ्यांची
पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 13.10 फूट, सुर्वे 16.2 फूट, रुई 42 फूट,
इचलकरंजी 39 फूट, तेरवाड 37.9 फूट, शिरोळ 30 फूट, नृसिंहवाडी 26.9 फूट, राजापूर 16.9
फूट तर नजीकच्या सांगली 9 फूट आणि अंकली 6.11
फूट अशी आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.