** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 15, 2019

18 हजार 57 कुटुंबांना आजअखेर 9 कोटी 1 लाख 80 हजार सानुग्रह वाटप - जिल्हाधिकारी दौलत देसाई




        कोल्हापूर, दि. 15 (जि.मा.का) :  आजअखेर जिल्ह्यातील 18 हजार 57 पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार अशी 9 कोटी 1 लाख 80 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
            पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामीण भागात 10 हजार आणि शहरी भागात 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. त्यापैकी 5 हजार रुपयांचा रोख वाटप करण्यात येत आहे. यात ग्रामीण भागातील 15 हजार 565 आणि शहरी भागातील 2 हजार 492 अशा एकूण 18 हजार 57 कुटुंबांना 9 कोटी 1 लाख 80 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित कुटुंबांनाही अनुदान वाटप सुरु आहे.
 0 0 00  0


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.