कोल्हापूर दि.16
(जिमाका) : जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड
या नावाने बँक ऑफ इंडियाच्या शाहूपुरी शाखेत खाते उघडण्यात आले आहे. त्याचा खातेक्रमांक
पुढीलप्रमाणे आहे. 090110110018730 IFSC CODE BKID0000901 असा असून पूरग्रस्तांच्या
मदतीसाठी या खात्यामध्ये मदत जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले
आहे.
मदत स्वीकारण्यासाठी शिरोली आणि अंबप
फाटा येथे मदत केंद्र
जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मदतीचा मोठा ओघ सुरु झाला आहे. ही मदत शिरोली एमआयडीसी
प्लॉट क्रमांक 1 येथे स्वीकारण्यात येत आहे. येथील संपर्क क्रमांक 9075748361. दुसरे
मदत केंद्र अंबप फाटा 8856801708 या क्रमांकावर स्वयंसेवी संघटनांनी मदत देण्यासाठी
संपर्क करावा, ही मदत प्रशासनामार्फत पूरग्रस्तांना वितरीत करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.