कोल्हापूर,
दि. 19 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील एकूण 54 हजार 943 कुटुंबांना रोख 5 हजार रुपये प्रमाणे
आज अखेर 27 कोटी 47 लाख 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. पूरबाधित
गावांतील 54 हजार 106 कुटुंबांना प्रत्येकी 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ याप्रमाणे
541.06 मे.टन मोफत गहू आणि तांदूळ वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांनी दिली.
सानुग्रह
अनुदान वाटप करण्यात आलेली तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे - करवीर 10 हजार 224 कुटुंब
5 कोटी 11 लाख 20 हजार, कागल 1 हजार 837 कुटुंब 91 लाख 85 हजार, पन्हाळा 875 कुटुंब
43 लाख 75 हजार, शाहुवाडी 442 कुटुंब 22 लाख
10 हजार, हातकणंगले 9 हजार 461 कुटुंब
4 कोटी 73 लाख 5 हजार, शिरोळ 29 हजार 782 कुटुंब 14 कोटी 89 लाख 10 हजार, राधानगरी 747 कुटुंब 37 लाख
35 हजार, भुदरगड 147 कुटुंब 7 लाख 35 हजार, गगनबावडा 101 कुटुंब 5 लाख 5 हजार, गडहिंग्लज
1 हजार 85 कुटुंब 54 लाख 25 हजार, आजरा 46
कुटुंब 2 लाख 30 हजार आणि चंदगड 196 कुटुंब 9 लाख 80 हजार असे एकूण 27 कोटी 47 लाख
15 हजार अनुदानाचे वाटप करण्यात आले.
0000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.