** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, August 20, 2019

जिल्ह्यात पावसाची विश्रांती




          कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : काल दिवसभरात जिल्ह्यात केवळ 9.79 मि.मी इतका पाऊस झाल्याने पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 2163.38 मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी अवघी 0.82 मिमी इतकी नोंद झाली.          
आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 0.25 मिमी एकूण 767.92 मिमी, शिरोळ निरंक एकूण 531.71 मिमी, पन्हाळा- निरंक एकूण 2078.14 मिमी, शाहूवाडी- 5.17 मिमी एकूण 2437.17 मिमी, राधानगरी- निरंक एकूण 2592 मिमी, गगनबावडा- 1 मिमी एकूण 5182 मिमी, करवीर- 0.45 मिमी एकूण 1590.91 मिमी, कागल- निरंक एकूण 1703.29 मिमी, गडहिंग्लज- निरंक एकूण 1303.57 मिमी, भुदरगड- निरंक एकूण 2310.80 मिमी, आजरा- 1.75 मिमी एकूण 2784.50 मिमी, चंदगड- 1.17 मिमी एकूण 2678.50 मिमी.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.