** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, August 19, 2019

पूरग्रस्तांसाठी प्रती कुटुंब 5 लिटर मोफत रॉकेल 34 टँकरला मंजुरी; दिरंगाई झाल्यास कारवाई -जिल्हाधिकारी दौलत देसाई



कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रती कुटुंब 5 लिटर रॉकेल मोफत वाटप करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 34 टँकर वितरणास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंजुरी दिली आहे. घाऊक रॉकेल वितरकांनी दिलेल्या रॉकेल कोट्याची तात्काळ उचल करून किरकोळ रॉकेल वितरकांस रॉकेल तात्काळ उपलब्ध करून द्यावे. दिरंगाई झाल्यास नैसर्गिक आपत्ती अधिनियम 2005 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
       तालुकानिहाय रॉकेल मंजूर टँकरची संख्या आणि घाऊक वितरकाचे नाव पुढीलप्रमाणे आहे. कागल आणि राधानगरी -शेतीमाल प्रकिया संघ -1 टँकर, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, गगनबावडा आणि करवीर- काळभैरव एजन्सीज-1 टँकर, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा आणि करवीर- काळभैरव एजन्सीज-1 टँकर, शिरोळ - शेतकरी सहकारी संघ - 5 टँकर, जनता कंझ्युमर्स -5 टँकर, सर्वोदय विकास सेवा सोसायटी- 5 टँकर, ए.जी. जाजल-1 टँकर असे एकूण 16 टँकर, हातकणंगले, इचलकरंजी - कोंडूसकर ब्रदर्स-3 टँकर, बी.जे.शेठ -3 टँकर, ए.जी. जाजल-1 टँकर असे एकूण 7 टँकर, करवीर, कोल्हापूर शहर भारत एजन्सी - 5 टँकर, कागल तालुका खरेदी विक्री संघ-3 टँकर असे एकूण 8 टँकर वितरणास मंजुरी दिली आहे.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.